ऑनलाईन जाहिराती ही आजची गरज आहे.
आपली प्रॉपर्टीविषयक आणि नोकरीविषयक जाहिरात जास्तीतजास्त लोकांपर्यंत कशी पोचवायची? हा प्रश्न जाहिरातदारांना नेहमी पडत असतो. मोबाईल फोन्स आणि सोशल मीडियाच्या ऑनलाईन युगात मुळात न्यूजपेपर्सचे वाचनच कमी झाले आहे हे वास्तव आहे. तरीही न्यूजपेपरमध्ये जाहिरात देणे हाच एक पर्याय आजवर लातूरकरांसाठी उपलब्ध होता. न्यूजपेपर मधील जाहिरात फक्त एक दिवस प्रसिद्ध होते आणि त्यात शब्दसंख्येची मर्यादा असते, प्रॉपर्टीविषयक जाहिरातींमध्ये प्रॉपर्टीचे फोटोज पब्लिश करता येत नाहीत. लातूर सारख्या निमशहरी भागात नियमितपणे न्यूजपेपर वाचणाऱ्यांची संख्या खूप मर्यादित आहे. शिवाय एका पेपरमधील जाहिरात दुसऱ्या पेपरच्या वाचकांना दिसत नाही. दुसरीकडे फेसबुक ग्रुप्समध्ये पोस्ट केलेल्या जाहिरातींचा organic reach फेसबुकने स्वतःच एक ते दोन टक्क्यांवर आणून ठेवला आहे. व्हाट्सअप ग्रुपमधील पोस्ट त्या ग्रुप पुरत्याच मर्यादित राहतात. अशा परिस्थितीमध्ये जाहिराती जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचवणे ही एक मोठी समस्या होऊन बसली आहे. ती सोडविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित खात्रीशीर, सक्षम, आणि प्रोफेशनल पर्याय म्हणून आम्ही LATUR MARKET ही ऑनलाईन जाहिरातींची सेवा सादर करत आहोत.
LATUR MARKET वरील जाहिरातींची वैशिष्ट्ये
प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करून लातूर शहर आणि परिसरातील वेगेवेगळ्या एक लाख लोकांना दररोज टार्गेट करणारी जाहिरात सेवा • ऑनलाईन जाहिराती असल्यामुळे बाहेरगावी किंवा परदेशात राहणाऱ्या लातूरकरांनाही आपल्या जाहिराती दिसतील. विशेषतः प्रॉपर्टीविषयक जाहिरातीसाठी याचा फायदा होईल • सर्व जाहिरातींचा प्रसिद्धी कालावधी एक महिना आहे. यामुळे अधिक काळापर्यंत आपली जाहिरात लोकांसमोर येत राहील • जाहिरातींमध्येच कॉन्टॅक्ट डिटेल्स पब्लिश केलेले असल्याने इच्छुक उमेदवार आपल्याशी थेट संपर्क साधतील.