FAQs

आपल्या मनातील काही प्रश्न आणि उत्तरे

laturmarket.com वर पब्लिश केलेल्या जाहिराती लोकांपर्यंत नक्की कशा पद्धतीने पोचतात?

laturmarket.com वरील जाहिराती लातूरकरांपर्यंत नेमकेपणाने पोचण्यासाठी आम्ही प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करतो. यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम यांवर पेड जाहिरातींचे कॅम्पेन दररोज चालवले जाते. हे ऑनलाईन डायनॅमिक कॅम्पेन असल्यामुळे दररोज वेगवेगळ्या एक लाख लातूरकरांपर्यंत laturmarket.com ची जाहिरात सेवा पोचवली जाते. 

प्रॉपर्टीसाठी ग्राहक शोधून देण्याचे / कर्मचारी शोधून देण्याचे अथवा सुचविण्याचे काम तुम्ही करता का?   

laturmarket.com ही नोकरीविषयक जाहिराती आणि प्रॉपर्टी विक्री / भाड्याने देणे या विषयाच्या जाहिराती प्रसिद्ध करण्याची वेबसाईट आहे. जाहिराती प्रसिद्ध करणे आणि त्या जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचविणे हा एकमेव उद्देश या वेबसाईटचा आहे. प्रॉपर्टीसाठी ग्राहक शोधून देणे अथवा व्यवसाय / ऑफिससाठी कर्मचारी शोधून देणे, ग्राहकाला प्रॉपर्टी सुचविणे आणि त्याच्या मोबदल्यात ब्रोकरेज/ कमिशन घेणे हा या वेबसाईटचा उद्देश नाही तसेच या स्वरूपाच्या कोणत्याही सेवा आम्ही देत नाही.     

न्यूजपेपर्स मधील जाहिराती आणि laturmarket.com वरील जाहिराती यांमध्ये काय फरक आहे?

न्यूजपेपरमधील जाहिराती ‘पर डे बेसिस’ वर पब्लिश केल्या जातात. त्या महागही असतात. त्यांना शब्दसंख्येची मर्यादा असते. तसेच वर्तमानपत्रांमध्ये प्रॉपर्टीविषयक जाहिराती फोटोजसह पब्लिश करता येत नाहीत. न्यूजपेपर विकत घ्यावे लागते आणि सध्याच्या ऑनलाईन युगात वर्तमानपत्रे वाचण्याचे प्रमाणही कमी होत चालले आहे. शिवाय एका पेपरमध्ये दिलेली जाहिरात दुसऱ्या पेपरच्या वाचकापर्यंत पोचत नाही. न्यूजपेपरमधील जाहिरातींना असलेल्या या मर्यादा laturmarket.com वरील ऑनलाईन जाहिरातींना लागू नाहीत. laturmarket.com वरील जाहिराती एक महिना कालावधीसाठी पब्लिश केल्या जातात. प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग तंत्राचा वापर करून ही सेवा दररोज एक लाख लातूरकरांपर्यंत पोचवली जाते. त्या सर्वांना मोबाइल फोनवर केंव्हाही, कुठेही मोफत पाहता येतात. लातूरशी संबंधित व्यक्ती बाहेरगावी, प्रवासात अथवा परदेशी गेली असेल तरीही त्यांना या जाहिराती दिसतील अशा पद्धतीने या सर्व्हिसचे डिजिटल मार्केटिंग केले जाते. जाहिरात पाहून तिथूनच इच्छुक व्यक्ती फोन, मेसेज करू शकतात. यामुळे वर्तमानपत्रातील पारंपरिक छोट्या जाहिरातींच्या तुलनेत laturmarket.com अधिक उपयुक्त आणि प्रभावी ठरतात.   

फेसबुक ग्रुप्समध्ये जाहिराती फ्री पोस्ट करता येतात. मी या वेबसाईटवर जाहिरात का देऊ?

2024 साली फेसबुक पोस्ट्सचा organic reach हा केवळ एक ते दोन टक्क्यांच्या आसपास होता असे जगातील दिग्गज डिजिटल मार्केटिंग कंपन्यांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. म्हणजेच आपल्याला अपेक्षित असलेल्या फक्त एक ते दोन टक्के लोकांपर्यंत आपली बिझनेस पोस्ट पोचत आहे. संदर्भ-1 , संदर्भ-2. यामागे प्रामुख्याने फेसबुकची कार्यपद्धती आणि त्यांचे व्यावसायिक धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे फेसबुक ग्रुपमध्ये केलेल्या व्यावसायिक पोस्ट्स फार कमी लोकांपर्यंत पोचतात आणि त्यांना अतिशय कमी प्रतिसाद मिळतो असा युजर्सचा अनुभव आहे. 

असे असेल तर मग फेसबुक ग्रुप्स कशासाठी आहेत?
फेसबुकला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखतो पण ही खऱ्या अर्थाने जाहिरात कंपनी आहे. आपल्या युजर्सना Sponsered Posts अर्थात पेड जाहिराती दाखवून उत्पन्न मिळवणे हा फेसबुकचा प्रमुख व्यवसाय आहे. यासाठी आपल्या युजर्सना कोणकोणत्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस घेण्यात स्वारस्य आहे हे जाणून घेणे फेसबुकसाठी आवश्यक आहे. हा interest अचूकपणे जाणून घेण्यासाठी फेसबुकने एक व्यापक यंत्रणा उभी केली आहे. यात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पेजेस, फेसबुक ग्रुप्स, मार्केट प्लेसेस, व्हिडीओज, रिल्स, स्टोरीज, मेसेंजर, लाईक्स, पोस्ट शेअरिंग, पर्सनल पोस्ट्स, पर्सनल प्रोफाईल्स अशा अनेक फीचर्सचा समावेश आहे. या फीचर्सचा जास्तीतजास्त वापर करायला लावून युजर्सचा इंटरेस्ट त्याच्या नकळत पण अचूकपणे जाणून घेण्यासाठी फेसबुकने विकसित केलेली ही अवाढव्य ‘डेटा कलेक्शन’ यंत्रणा आहे. फेसबुक वरील ग्रुप मेम्बर्सचा व्यवसाय वाढवण्यात अथवा त्यांच्या प्रॉपर्टीला ग्राहक शोधून देण्यात, हवे असलेले कर्मचारी शोधून देण्यात फेसबुकला स्वारस्य नाही तर त्या-त्या ग्रुप मधील हजारो-लाखो युजर्सना कोणकोणत्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसमध्ये इंटरेस्ट आहे हे जाणून घेण्यात आहे. या इंटरेस्टच्या आधारे युजर्सना त्या-त्या व्यवसायांच्या जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकची संपूर्ण अर्थव्यवस्था “user interest and behaviour” मधून मिळणाऱ्या डेटावर अवलंबून आहे. मात्र प्रोफेशनल सोशल मीडिया मार्केटिंग कशा पद्धतीने काम करते याची पुरेशी माहिती सर्वसामान्य फेसबुक युजर्सना नसते. त्यामुळे ते बिझनेस प्रमोशनसाठी, प्रॉपर्टीला ग्राहक शोधण्यासाठी, कर्मचारी शोधण्यासाठी  ग्रुप पोस्ट्स वर अवलंबून राहतात. पण फेसबुक पोस्ट्सचा organic reach फेसबुक अल्गोरिदमने अत्यंत मर्यादित ठेवलेला असल्यामुळे एखाद्या ग्रुप मध्ये हजारो मेम्बर्स असूनही आपल्या पोस्टला रिस्पॉन्स का मिळत नाही याचे उत्तर फेसबुकच्या या कार्यपद्धतीमध्ये दडलेले आहे.  

न्यूजपेपर्स मधील जाहिरातींच्या मर्यादा आणि फेसबुक ग्रुप पोस्टची कार्यपद्धती आपण लक्षात घेतली तर ऑनलाईन जाहिराती देण्यासाठी लातूर मार्केट ही वेबसाईट सर्व दृष्टींनी आदर्श आहे.      

मी laturmarket.com वर जाहिरात दिली होती पण एक महिना कालावधी पूर्ण होण्यापूर्वीच जाहिरातीचा उद्देश सफल झाला आहे. आता मी माझी जाहिरात बंद करू शकतो का?

नक्कीच! कृपया आम्हाला आपल्या जाहिरातीचे डिटेल्स पाठवा आणि जाहिरात बंद करण्याविषयी कळवा. आपली जाहिरात बंद केली जाईल.