जाहिरात पब्लिश करा

फेसबुक आणि इंस्टाग्राम वरील पेड प्रमोशन (Sponsered Post) चा वापर करून लातूर शहरातील किमान एक लाख रहिवाशांपर्यंत ही जाहिरात सेवा दररोज पोचवली जात आहे. 

जाहिरात या पद्धतीने पाठवा

महत्वाची सूचना

जाहिरातदाराचे नाव आणि पत्ता पाठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय जाहिरात पब्लिश केली जाणार नाही. जाहिरातदार प्रॉपर्टी ओनर आहे की एजंट याचाही उल्लेख करावा. प्रॉपर्टीविषयक जाहिरातीसोबत जास्तीतजास्त बारा फोटोज पब्लिश केले जातील. हे फोटोज सुद्धा जाहिरातीसोबत पाठवा.

………

नमुना जाहिरात 

शिवाजी चौकापासून पाच मिनिटांच्या अंतरावर अंबेजोगाई रोड लगत नामांकित हौसिंग सोसायटीमध्ये पाच रूम्सचा दोन मजली सुंदर बंगला विकणे आहे. प्लॉट साईझ ५०X६० फूट. पूर्व दिशेला ५० फूट रुंदीचा रस्ता. आर्किटेक्ट प्लॅन नुसार २०१२ साली केलेले आर सी सी बांधकाम. आकर्षक एलिव्हेशन. चारही बाजूना कंपाउंड वॉल आणि दहा फूट रुंदीचे लोखंडी गेट आहे. पाण्यासाठी बोअरवेल आणि मोटार आहे. प्रॉपर्टीची कागदपत्रे क्लिअर आहेत. अधिक माहिती आणि फोटोजसाठी कृपया संपर्क साधा: १२३४५६७८९०

जाहिरातदाराचे नाव: XXXX XXXX XXXXXX
जाहिरातदार प्रॉपर्टी ओनर आहे की एजंट याचा उल्लेख करावा
पत्ता: XXXX, XXXXX, XXXXX

महत्वाची सूचना

जाहिरातदाराचे नाव आणि जाहिरातदाराचा पत्ता तसेच डिटेल्ड जॉब लोकेशन पाठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय जाहिरात पब्लिश केली जाणार नाही. जाहिरातीच्या मजकुरामध्ये नोकरीचे स्वरूप, जॉब लोकेशन याविषयी पुरेशी स्पष्टता नसेल तर अशी जाहिरात पब्लिश केली जाणार नाही. रिक्रुटमेंट एजन्सीज, रिक्रुटमेंट एजंट्स यांच्या जाहिराती पब्लिश केल्या जाणार नाहीत याची कृपया नोंद घ्यावी . 

………

नमुना जाहिरात 

लातूरमधील नामांकित ऍड एजन्सीला पुढील प्रमाणे कर्मचारी हवे आहेत. १) ग्राफिक डिझायनर- (मेल / फिमेल) शिक्षण किमान १२ वी. फोटोशॉप, कोरल ड्रॉ, श्रीलिपी येणे आवश्यक. किमान दोन वर्षे अनुभव असावा. २) अकाउंटंट (मेल / फिमेल) शिक्षण –  Bcom + Tally & Excel. किमान दोन वर्षे अनुभव असावा. ३) ड्रायव्हर- (मेल ) शिक्षण किमान १० वी. निर्व्यसनी आणि होतकरू असावा. हाय एन्ड ऑटोमॅटिक कार्स चालवण्याचा अनुभव आवश्यक. जॉब लोकेशन- एबीसी कम्युनिकेशन्स, आदर्श कॉलनी बस स्टॉप जवळ,औसा रोड, लातूर. मोबाईल :  १२३४५६७८९०

जाहिरातदाराचे नाव: XXXX XXXX XXXXXX 
पत्ता: XXXX, XXXXX, XXXXX

महत्वाची सूचना

जाहिरातदाराचे नाव आणि पत्ता पाठवणे आवश्यक आहे. त्याशिवाय जाहिरात पब्लिश केली जाणार नाही.  जाहिरातदार ओनर आहे की एजंट याचाही उल्लेख करावा. वाहन विक्रीविषयक जाहिरातीसोबत जास्तीतजास्त सहा फोटोज पब्लिश केले जातील. हे फोटोज सुद्धा जाहिरातीसोबत पाठवा. 

………

नमुना जाहिरात 

मार्च २०२० सालची ZXI पेट्रोल मारुती सुझुकी स्वीफ़्ट विकणे आहे. डॉक्टरांनी एकहाती वापरलेली कार. व्हाईट कलर, शोरूम कंडिशन, नवीन बॅटरी आणि नवीन टायर्स. फक्त 40,000 किमी रनिंग. सर्व्हिसिंग रेकॉर्ड आणि इन्शुअरन्स आहे.  संपर्क: 1234567890        

जाहिरातदाराचे नाव: XXXX XXXX XXXXXX 
जाहिरातदार प्रॉपर्टी ओनर आहे की एजंट याचा उल्लेख करावा
पत्ता: XXXX, XXXXX, XXXXX

आपल्या मनातील काही प्रश्न आणि उत्तरे

laturmarket.com वरील जाहिराती लातूरकरांपर्यंत नेमकेपणाने पोचण्यासाठी आम्ही प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग तंत्रज्ञानाचा वापर करतो. यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम यांवर पेड जाहिरातींचे कॅम्पेन दररोज चालवले जाते. हे ऑनलाईन डायनॅमिक कॅम्पेन असल्यामुळे दररोज वेगवेगळ्या एक लाख लातूरकरांपर्यंत laturmarket.com ची जाहिरात सेवा पोचवली जाते. यासाठी आवश्यक असलेली तांत्रिक कुशलता आणि स्वतःचे मनुष्यबळ laturmarket.com कडे आहे.       

न्यूजपेपरमधील जाहिराती ‘पर डे बेसिस’ वर पब्लिश केल्या जातात. त्या बऱ्याच महाग असतात. त्यांना शब्दसंख्येची मर्यादा असते तसेच त्यांच्यामध्ये प्रॉपर्टीविषयक जाहिराती फोटोजसह पब्लिश करता येत नाहीत. न्यूजपेपर विकत घ्यावे लागते आणि त्याची वाचनसंख्या मर्यादित असते. शिवाय एका पेपरमध्ये दिलेली जाहिरात दुसऱ्या पेपरच्या वाचकापर्यंत पोचत नाही. न्यूजपेपरमधील जाहिरातींना असलेल्या या मर्यादा laturmarket.com वरील ऑनलाईन जाहिरातींना लागू नाहीत. laturmarket.com वरील जाहिराती एक महिना कालावधीसाठी पब्लिश केल्या जातात. प्रोफेशनल डिजिटल मार्केटिंग तंत्राचा वापर करून ही सेवा दररोज एक लाख लातूरकरांपर्यंत पोचवली जाते. त्या सर्वांना मोबाइल फोनवर केंव्हाही मोफत पाहता येतात. जाहिरात पाहून तिथूनच इच्छुक व्यक्ती फोन, मेसेज करू शकतात.    

२०२३ साली फेसबुक पोस्ट्सचा organic reach हा केवळ एक ते दोन टक्क्यांच्या आसपास होता असे जगातील दिग्गज मार्केटिंग कंपन्यांच्या अभ्यासातून दिसून आले आहे. म्हणजेच आपल्याला अपेक्षित असलेल्या फक्त एक ते दोन टक्के लोकांपर्यंत आपली बिझनेस पोस्ट पोचत आहे. संदर्भ-1 , संदर्भ-2 यामागे प्रामुख्याने फेसबुकची कार्यपद्धती आणि त्यांचे व्यावसायिक धोरण कारणीभूत आहे. त्यामुळे फेसबुक ग्रुपमध्ये केलेल्या व्यावसायिक पोस्ट्स फार कमी लोकांपर्यंत पोचतात आणि त्यांना अतिशय कमी प्रतिसाद मिळतो असा युजर्सचा अनुभव आहे. पण असे का होते? याचे सविस्तर उत्तर पुढे दिले आहे.

ग्रुप पोस्ट सर्वाना का दाखवल्या जात नाहीत?
कल्पना करा की तुम्हाला प्रॉपर्टी भाड्याने द्यायची आहे अथवा विक्री करायची आहे आणि यासाठी तुम्ही प्रॉपर्टीविषयक दहा फेसबुक ग्रुप्समध्ये त्याची पोस्ट पब्लिश केली आहे. या दहा ग्रुप्सची एकूण सदस्यसंख्या पाच लाख आहे. यामुळे तुम्हाला असे वाटू शकते की आपली पोस्ट आता पाच लाख लोकांपर्यंत जाईल. मात्र फेसबुकची यंत्रणा (Facebook algorithm) अशा पद्धतीने काम करत नाही. फेसबुक ग्रुप्समध्ये पब्लिश केलेली पोस्ट सर्व ग्रुप मेम्बर्सना दाखवली जात नाही तर अगदी मोजक्या लोकांनाच दाखवली जाते हे वास्तव आहे. याचा पडताळा तुम्ही स्वतः सहजपणे घेऊ शकता. यासाठी आता उलट विचार करा. आता अशी कल्पना करा की तुम्ही आता पोस्ट पब्लिश करणारे नाही तर ‘पोस्ट्स वाचणारे’ एक युजर आहात. तुम्हीपण वेगवेगळ्या दहा फेसबुक ग्रुप्सचे मेम्बर आहात आणि या दहा ग्रुप्सची एकूण सदस्यसंख्या पाच लाख आहे. आपण असे गृहीत धरू की या ग्रुप्समध्ये पाच लाख लोकांपैकी फक्त एक दोन टक्के म्हणजे दहा हजार लोक या ग्रुप्समध्ये दररोज व्यावसायिक जाहिराती पोस्ट करत असतात. वास्तविक बिझनेस ग्रुप्समध्ये दररोज जाहिराती पोस्ट करणाऱ्यांची संख्या यापेक्षा कितीतरी जास्त असते तरीही आपण इथे उदाहरणासाठी फक्त दोन टक्के हे प्रमाण गृहीत धरू. या दोन टक्के म्हणजे दहा हजार लोकांनी पब्लिश केलेल्या दहा हजार जाहिराती तुम्हाला दररोज दाखवल्या जात आहेत अशी कल्पना करा. अशा वेळी तुमची प्रतिक्रिया काय असेल? तुम्ही नक्कीच वैतागून जाल. ग्रुपमध्ये असलेल्या मेम्बर्सनी पोस्ट केलेल्या जाहिराती तुम्हाला एका पाठोपाठ दिसू लागल्या तर तुम्ही खरोखर वैतागून जाल. फेसबुकचा वापर आपण दिवसातून जास्तीतजास्त दोन तास करतो असे गृहीत धरले तर एका तासात पाच हजार म्हणजे मिनिटाला ऐंशी पोस्ट्स अर्थात पाऊण सेकंदाला एक बिझनेस पोस्ट तुम्हाला पाहावी लागेल. फेसबुकचा वापर तुम्ही यासाठी नक्कीच करत नाही.

फेसबुकचा वापर लोक कशासाठी करतात?
खरेतर फेसबुकवर आपले मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांचे लेटेस्ट अपडेट्स पाहण्यात, त्यांनी केलेल्या पर्सनल पोस्ट्स आणि त्यांचे फोटो पाहण्यात आपल्याला जास्त इंटरेस्ट असतो. या पर्सनल कनेक्टसाठी आणि मनोरंजनासाठी आपण फेसबुक वापरतो. मात्र त्या ऐवजी तुमच्यासाठी गैरलागू आणि निरुपयोगी असलेल्या बिजनेस पोस्ट्स प्रचंड संख्येने दिसू लागल्या तर तुम्ही नक्कीच वैतागून जाल. म्हणजेच तुमचा फेसबुकवरील ‘युजर एक्स्पिरिअन्स’ आनंददायक आणि उत्साहवर्धक राहणार नाही. प्रचंड संख्येने येणाऱ्या बिझनेस पोस्ट्सना कंटाळून तुम्ही त्या ग्रुप्स मधून बाहेर पडाल, हळूहळू फेसबुक वापरणे कमी कराल किंवा कदाचित बंदही कराल.  याची फेसबुकला पूर्ण कल्पना आहे पण त्यांना असे होऊ द्यायचे नाही. फेसबुकला आपल्या युजर्सची संख्या वाढतीच ठेवायची आहे आणि त्यांना ‘एन्गेज’ सुद्धा ठेवायचे आहे. हे साध्य करण्यासाठी आणि युजर्सची एंगेजमेंट वाढवण्यासाठी ‘ग्रुप पोस्ट डिलिव्हरी’ वर फेसबुकने स्वतःच नियंत्रण आणले आहे. मात्र कोणाला कोणत्या आणि किती ग्रुप पोस्ट्स दाखवायच्या याविषयीचे धोरण फेसबुकने उघड केलेले नाही. मात्र थोडा बारकाईने विचार केला तर फेसबुक ग्रुप मधील सर्व पोस्ट सर्वांना दाखवल्या जात नाहीत ही बाब सहज पटेल.

फेसबुकचे व्यावसायिक धोरण.
“फेसबुकचा वापर मित्र-मैत्रिणींच्या, समविचारी लोकांच्या संपर्कात राहण्यासाठी करा आणि प्रभावी पद्धतीने व्यावसायिक जाहिराती करण्यासाठी फेसबुक वरील ‘Sponsored Posts’ चा वापर करा म्हणजेच पैसे देऊन जाहिरात करा.” हे फेसबुकचे अधिकृत धोरण आहे. पैसे देऊन केलेल्या जाहिराती मधून मिळणारा महसूल हेच फेसबुकचे उत्पन्नाचे सर्वात मोठे साधन आहे. बिझनेस ग्रुपमधील सर्व फ्री पोस्ट्स सर्वाना दाखवल्या जाऊ लागल्या तर मग फेसबुकवर पैसे देऊन जाहिरात कोण आणि कशासाठी करेल? फेसबुकचे ‘बिझनेस मॉडेल’ त्यामुळे धोक्यात येईल. हे टाळण्यासाठी आणि व्यावसायिकांनी पैसे देऊन जाहिराती कराव्यात यासाठी फेसबुक वेगवेगळे मार्ग अवलंबत आहे. ‘ग्रुप पोस्ट डिलिव्हरी’ च्या संख्येवरील वरिल नियंत्रण हा त्यांच्या उत्पन्नवाढीच्या आणि ‘better user experience’ धोरणाचा एक भाग आहे.

असे असेल तर मग फेसबुक ग्रुप्स कशासाठी आहेत?
फेसबुकला आपण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म म्हणून ओळखतो पण ही खऱ्या अर्थाने जाहिरात कंपनी आहे. आपल्या युजर्सना व्यावसायिकांच्या Sponsered Posts अर्थात पेड जाहिराती दाखवून उत्पन्न मिळवणे हा फेसबुकचा प्रमुख व्यवसाय आहे. यासाठी आपल्या युजर्सना कोणकोणत्या प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेस घेण्यात स्वारस्य आहे हे जाणून घेणे फेसबुकसाठी आवश्यक आहे. युजरचा interest आणि त्याचे फेसबुकवरचे behaviour यांच्या आधारे त्या-त्या विषयाच्या जाहिराती युजर्सना दाखवल्या जातात. हा interest अचूकपणे जाणून घेण्यासाठी फेसबुकने एक व्यापक यंत्रणा उभी केली आहे. यात फेसबुक आणि इंस्टाग्रामवरील पेजेस, ग्रुप्स, मार्केट प्लेसेस, व्हिडीओज, रिल्स, स्टोरीज, मेसेंजर, लाईक्स, पोस्ट शेअरिंग, पर्सनल पोस्ट्स, पर्सनल प्रोफाईल्स, व्हाट्सऍप बिझनेस अकाउंट्स, व्हाट्सऍप ग्रुप्स, अशा अनेक सर्व्हिसेस आणि त्यातील फीचर्सचा समावेश आहे. या सर्व्हिसेस आणि फीचर्सचा जास्तीतजास्त वापर करायला लावून युजर्सचा इंटरेस्ट अलगदपणे आणि अचूकपणे जाणून घेण्यासाठी फेसबुकने विकसित केलेली ही अवाढव्य ‘डेटा कलेक्शन’ यंत्रणा आहे. फेसबुकची संपूर्ण अर्थव्यवस्था “user interest and behaviour” मधून मिळणाऱ्या डेटावर अवलंबून आहे. त्यामुळे ग्रुप मेम्बर्सचा व्यवसाय वाढवण्यात, तुमच्या प्रॉपर्टीला ग्राहक शोधून देण्यात, तुम्हाला कर्मचारी मिळवून देण्यात फेसबुकला स्वारस्य नाही तर त्या-त्या ग्रुप मधील हजारो-लाखो युजर्सना विविध प्रॉडक्ट्स आणि सर्व्हिसेसमध्ये असलेला इंटरेस्ट एकगठ्ठा जाणून घेण्यात आहे. याचा वापर करून युजर्सना त्या-त्या व्यवसायांच्या जाहिराती दाखवल्या जातात. फेसबुकसाठी ग्रुप्सचा मुख्य उद्देश हा आहे. मात्र प्रोफेशनल सोशल मीडिया मार्केटिंग कशा पद्धतीने काम करते याची पुरेशी माहिती सर्वसामान्य फेसबुक युजर्सना नसते. त्यामुळे ते बिझनेस प्रमोशनसाठी फक्त ग्रुप पोस्ट्स वरच अवलंबून राहतात. पण फेसबुक पोस्ट्सचा organic reach अत्यल्प असल्यामुळे एखाद्या ग्रुप मध्ये पन्नास हजार, एक लाख मेम्बर्स असूनही आपल्या पोस्टला अपेक्षित रिस्पॉन्स का मिळत नाही याचे उत्तर फेसबुकच्या या कार्यपद्धतीमध्ये दडलेले आहे.

यावर उपाय काय ?
फेसबुकने विकसित केलेल्या यंत्रणेचा वापर करून संभाव्य ग्राहकापर्यंत पोचण्यासाठी फेसबुकवर पैसे देऊन जाहिराती करणे हा एकमेव पर्याय आपल्यासमोर आहे. मात्र प्रत्येकाला स्वतः फेसबुकवर ‘पेड कॅम्पेन’ चालवणे शक्य नसते. यासाठी डिजिटल मार्केटिंग मधील शास्त्रशुद्ध ज्ञान, अनुभव आवश्यक असते. शिवाय वैयक्तिक पातळीवर ही मोठी खर्चिक बाब असते. या सर्व समस्यांवर उपाय म्हणजे laturmarket.com ही जाहिरात सेवा आहे. इथे आपल्याला फोन नंबरसह आपली जाहिरात पब्लिश करता येते. ज्यांना आपल्या जाहिरातीमध्ये स्वारस्य आहे ते रजिस्ट्रेशन आणि अटी-शर्ती शिवाय थेट आपल्याला फोन करू शकतात.

नक्कीच! कृपया आम्हाला व्हाट्सअप मेसेजद्वारे आपल्या जाहिरातीचे डिटेल्स पाठवा आणि जाहिरात बंद करण्याविषयी कळवा. आपली जाहिरात बंद केली जाईल.